Prime Minister Internship Scheme : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मुदतवाढ; 18 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळणार

Pradeep Pendhare

कौशल्य रोजगार

बेरोजगारांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

योजनेसाठी मुदतवाढ

या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

18 प्रकारचे प्रशिक्षण

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेनुसार एकूण 18 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

उमेदवाराला पाठ्यवृत्ती

केंद्र सरकारने यासाठी 500 कंपन्यांसोबत करार करण्यात आला, असून प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला वर्षभरात 66 हजार रुपये पाठ्यवृत्ती मिळते.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

महिन्याला पाच हजार

प्रशिक्षण सुरू असलेल्या कंपनीकडून 500 रुपये, तर 4 हजार 500 रुपये केंद्र सरकारचे, असे एकूण महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

विमा सुरक्षा

आकस्मिक निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये देत, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना देखील लागू आहे.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

सरकारी नोकरी

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखांपेक्षा जास्त नसावे, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

वयाची अट

पूर्णवेळ विद्यार्थी किंवा नोकरदार नसावा, तसेच वय 21 ते 24 असावे, अशा या योजनेच्या अटी आहेत.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama

योजनेसाठी पात्रता

दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, आयटीआय किंवा बीए, बीकॉम, तत्सम शिक्षण उत्तीर्ण. परंतु बेरोजगार या योजनेसाठी पात्र असेल.

Prime Minister Internship Scheme | Sakarnama

NEXT : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आडकणार लग्न बंधनात, 'या' बोटीवर पार पडणार विवाह सोहळा

येथे क्लिक करा :