PM Modi Rally : राम जन्मभूमी अयोध्येत पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो!

Mayur Ratnaparkhe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रविवारी अयोध्येत भव्य रोड शो झाला.

नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत केले.

मोदींच्या रॅलीसाठी सुंदर रंगीत फुलांनी विशेष वाहन सजवले गेले होते.

मोदींच्या स्वागतासाठी तरुणीही पारंपारिक वेशभुषेत आल्या होत्या.

लहानांपासून ते थोरांपर्यंत मोदींची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत होतं.

महिलावर्गही मोठ्या संख्येने मोदींचे स्वागत करण्यास हजर होता.

तरुणाईने श्रीरामचा ध्वज फडकवत मोदींचे स्वागत केले.

मोदींच्या रोडशोच्या मार्गावर प्रचंड प्रमाणात पुष्पवृष्टी केली गेली.

अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर निर्माण केल्याबद्दल मोंदींचे आभार व्यक्त केले गेले.

महिलावर्गाने मोदींच्या औक्षणासाठी आरतीचे ताटही आणले होते.

हातात प्रतिकात्मक कमळ घेऊन मोदी सर्व नागरिकांना ते दर्शवत होते.

NEXT : PM Modi Rally : बारामतीत प्रचार गार; अजित पवारांचा शरद पवार गटावर प्रहार