सरकारनामा ब्यूरो
प्रामाणिक, नम्र आणि नेहमी हळू बोलणारे लाल बहादूर शास्त्री यांनी कोणताही गाजावाजा न करता देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.
शास्त्रीजींचा जन्म उत्तर प्रदेश येथील मुगलसराय शहरातील कायस्थ कुटुंबात झाला होता.
कायस्थ कुटुंबात श्रीवास्तव आणि वर्मा हे आडनाव वापरण्याची परंपरा होती. लाल बहादूर शास्त्री यांचे बालपणीचे आडनाव वर्मा होते.
सहावीपर्यंतचे शिक्षण मुघलसराय येथे झाले. त्यानंतर वाराणसीला बदली झाल्यामुळे त्यांना तिथे जावे लागले.
वाराणसीच्या हरीश चंद्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी वर्मा आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला.
दहावीत असताना त्यांनी शाळा सोडली आणि काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेत स्वातंत्र्य चळवळीत प्रवेश केला.
महात्मा गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक जेबी कृपलानी हे लाल बहादूरांना मार्गदर्शन करत असे.
तरुणांना राष्ट्रवादीचे शिक्षण देण्यासाठी कृपलानी यांच्या मदतीने महात्मा गांधींनी वाराणसीच्या काशी विद्यापीठाची स्थापना केली.
काशी विद्यापीठातून 'शास्त्री' पदवी प्राप्त केल्यानंतर लाल बहादूरांनी वर्मा ऐवजी शास्त्री आडनाव जोडले. यानंतर लाल बहादूर वर्मा हे लाल बहादूर शास्त्री म्हणून प्रसिद्ध झाले.