Pradeep Pendhare
देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रभावशाली कार्यालयांपैकी एक पंतप्रधान कार्यालयात नोकरी मिळवण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असते.
PMO मध्ये थेट भरती खूप कमी प्रमाणात होते. येथे बहुतांश अधिकारी सरकारच्या अन्य विभागातून निवडले जातात.
PMO मध्ये काम करण्याचा प्रमुख मार्ग UPSC परीक्षा असते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले IAS, IPS किंवा IFS अधिकारी बनतात. अनुभवावर त्यांची PMO कार्यालयात प्रतिनियुक्ती होते.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी त्यांच्या चांगल्या कामगिरीवर PMO कार्यालयात पाठवले जातात.
पंतप्रधान कार्यालयात काम करण्यासाठी संवाद कौशल्ये आणि प्रशासकीय समज असणे देखील महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान कार्यालयातील पगार पद आणि अनुभवावर अवलंबून असतो. IAS अधिकाऱ्यांचा पगार दरमहा सुमारे 56100 रूपयांपासून सुरू होतो आणि त्यात वाढ होते.
वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांना दरमहा 1 लाख ते 2.50 लाख, तर तज्ञ आणि सल्लागारांना त्यांच्या अनुभवानुसार 80 हजार ते 2 लाख किंवा त्याहून अधिक पगार असतो.
सेक्शन ऑफिसर किंवा सहाय्यक यांसारख्या इतर पदांवरील अधिकाऱ्यांना 44900 रूपये ते 1 लाख 42 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो.
पगाराव्यतिरिक्त पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासकीय निवास, वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि सुरक्षा यांसारखे विविध सरकारी लाभ मिळतात.