RBI New FD Rules : 'RBI'ने बदलले नियम, मोठ्या 'FD'बाबत व्याजाचा बँकांना अधिकार; काय होणार परिणाम?

Pradeep Pendhare

'RBI'चे नवा नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठ्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) रकमेवरील व्याजदरांबाबत नवे नियम जाहीर केले आहेत.

RBI New FD Rules | Sarkarnama

1 ऑक्टोबरपासून

RBI हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026पासून देशभरातील सर्व बँकांमध्ये लागू होणार आहेत.

RBI New FD Rules | Sarkarnama

बँकांना मुभा

RBIच्या नव्या निर्देशांनुसार, बँकांना आता बल्क डिपॉझिट रकमेवर वेगवेगळे व्याजदर निश्चित करण्याची मुभा असेल.

RBI New FD Rules | Sarkarnama

नियमाचे बंधन

RBIने स्पष्ट केले आहे की, एखाद्या बँकेच्या सर्व शाखांमध्ये समान प्रकारच्या आणि समान रकमेच्या ठेवांवर एकच व्याजदर लागू असणे बंधनकारक असेल.

RBI New FD Rules | Sarkarnama

सकाळचा दहाचा नियम

सर्व बँकांना प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत बल्क डिपॉझिटवरील व्याजदर त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करणे बंधनकारक असेल.

RBI New FD Rules | Sarkarnama

स्पर्धा वाढणार

RBI च्या या निर्णयामुळे मोठ्या ठेव रकमा आकर्षित करण्यासाठी बँकांमध्ये अधिक स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

RBI New FD Rules | Sarkarnama

पारदर्शकता मजबूत

या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये भेदभाव होण्याची शक्यता कमी होईल आणि बँकिंग व्यवस्थेतील पारदर्शकता अधिक मजबूत होईल.

RBI New FD Rules | Sarkarnama

RBI New FD Rulesगुंतवणूकदारांचा फायदा

मोठ्या रकमेची FD करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 1 ऑक्टोबरच्या व्याजदरांची तुलना करूनच अंतिम निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.

RBI New FD Rules | Sarkarnama

कठोर अटी

या नियमांनुसार बँकांना काही प्रकरणांमध्ये व्याजदर ठरवण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार असले, तरी ग्राहकांशी समान वागणूक आणि पारदर्शकतेसाठी कठोर अटी असणार आहे.

RBI New FD Rules | Sarkarnama

NEXT : खर्गेंना न्यायालयाचे वॉरंट; 100 कोटींचा दावा

येथे क्लिक करा :