Jagdish Patil
चित्रपट निर्माते आणि माजी खासदार प्रितीश नंदी यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते.
चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी लेखक पत्रकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
प्रितीश नंदी यांचा जन्म 15 जानेवारी 1951 रोजी बिहारमधील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता.
त्यांनी कवी, पत्रकार, चित्रकार, मीडिया आणि दूरदर्शन क्षेत्रात काम केलं आहे.
1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
2000 च्या दशकाच्या सुरुवातीस प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स या बॅनरखाली सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली यांसारख्या ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती.
1990 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘प्रितिश नंदी शो’ नावाचा टॉक शो त्यांनी होस्ट केला होता.