Roshan More
प्रियांका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत. मात्र, त्या फक्त कार्यालयात बसून निवडणुकीचे नियोजन करणार नाही तर उमेदवार निवड देखील करणार आहेत.
आसाम विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी स्क्रिनिंग समितीची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर देण्यात आली आहे.
स्क्रीनिंग समिती (छाननी समिती) ही उमेदवारांची निवड करते. कोणाला तिकीट मिळायला हवे याची शिफारस करते.
2019 च्या पूर्वी प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, नंतर तेथे त्यांना यश मिळाले नाही. आता पक्षाने आसामध्ये त्यांना मैदानात उतरवले आहे.
प्रियांका गांधी यांच्या सोबत आसाम विधानसभेच्या निवडणुकीची तयारीसाठी दोन दिग्गज नेते देण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रियांका गांधींसोबत आसामध्ये रणनीती आखणार आहेत.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यावर देखील आसामची जबाबदारी देण्यात आली आहेत. त्यामुळे बघेल आणि शिवकुमार या दोघांच्या मदतीने प्रियांका आसामध्ये रणनीती आखणार आहेत.