सरकारनामा ब्युरो
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत पुण्याची 27 वर्षीय प्रियांका कांबळे उत्तीर्ण झाली आहे.
महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रियांका कांबळे हिचे तिसरीनंतर शिक्षण सुटले होते.
लग्नानंतर ती सोलापूर येथील सासरच्या घरी राहायला गेली. पण सासरी 'अनपढ' म्हणत आणि तिचा अपमान करायचे.
या टोमण्यांमुळे सतत भांडणे होत व्हायची. त्यानंतर प्रियंकाने सासरचे घर सोडले आणि पुण्यात आली.
कमाई करण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी तिने महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला सुरुवात केली.
सोबतच 2022 मध्ये रमाबाई रानडे शाळेत प्रवेश घेतला. स्वच्छतेचे काम, घर आणि जबाबदाऱ्या संभाळून तिने अभ्यास केला.
ती सकाळी कचरा गोळा करायची, मुलासाठी जेवण बनवायची आणि दुपारी 2 वाजेपर्यंत शाळेत पोहोचायची.
आता या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून प्रियांकाने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिला 47.60 टक्के गुण मिळाले आहेत.
"त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. मला ते चुकीचे सिद्ध करायचे होते, असे म्हणत प्रियांकाने या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
मी जिथे काम करते त्या भागातील रहिवाशांनी माझे अभिनंदन केले, मी आता अंगणवाडी सेविका होण्याचे स्वप्न पाहत आहे, असेही प्रियांकाने सांगितले.