जायंट किलर' महिला नेत्याची राज्यसभेत होणार एन्ट्री! भाजपची खेळी

Rashmi Mane

‘जायंट किलर’ची राज्यसभेत एन्ट्री!

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभा जागांच्या आगामी निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये प्रियंका सिंह रावत यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

2014 मध्ये मोठा उलटफेर

प्रियंका सिंह रावत यांनी 2014 मध्ये बाराबंकी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते पी.एल. पुनिया यांचा तब्बल 2,11,000 मतांनी पराभव केला होता.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

वयाच्या 28व्या वर्षी खासदार

भाजपने 16 मार्च 2014 रोजी अवघ्या 28व्या वर्षी प्रियंका यांना उमेदवारी दिली. पहिल्याच मोठ्या निवडणुकीत त्यांनी जोरदार विजय मिळवत ‘जायंट किलर’ अशी ओळख निर्माण केली.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

शिक्षणातही आघाडी

प्रियंका यांचा जन्म 7 ऑगस्ट 1985 रोजी बरेली येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर मास कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक जर्नलिझमचा डिप्लोमा केला.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

राजकारणाची आवड

विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच प्रियंका राजकारणाकडे वळल्या. विद्यार्थी जीवनात त्यांची लायब्ररी इन्चार्ज म्हणूनही निवड झाली होती.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

संसदेतही सक्रिय भूमिका

खासदार म्हणून प्रियंका यांनी अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण समितीत काम केले. महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीतही त्यांनी सहभाग घेतला.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

कुटुंबाची पार्श्वभूमी

प्रियंका यांचे वडील उत्तम राम सिंह निवृत्त PCS अधिकारी आहेत. 2007 मध्ये त्यांचा IRS अधिकारी रघुनाथ रावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना दोन मुली आहेत.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

भाजपची मोठी खेळी?

राज्यसभेच्या माध्यमातून प्रियंका रावत यांना पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करण्याचा भाजपचा प्रयत्न मानला जात आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळू शकते.

Priyanka Singh Rawat | Sarkarnama

संसदेत एकही दिवस न जाताच खासदारकीचा राजीनामा, आता 'या' महिला नेत्याची भाजपला भुरळ

येथे क्लिक करा