मृत्यूपत्रात जमीन तर मिळाली, पण तुमच्या नावावर कशी होणार? जाणून घ्या, संपत्ती नावावर करण्याची सोपी प्रक्रिया!

Rashmi Mane

मृत्युपत्र बनलं, पण ..

मृत्युपत्रात जमीन किंवा घर तुमच्या नावावर केले असेल, तरी सरकारी रेकॉर्डमध्ये नाव आपोआप बदलत नाही. त्यासाठी संबंधित महसूल कार्यालयात नामांतराची प्रकिया पूर्ण करावी लागते.

मृत्युनंतरच प्रक्रिया सुरू

ज्या व्यक्तीचं मृत्युपत्र आहे त्याच्या मृत्यूनंतरच त्याच्या आधारे हक्काची प्रकिया सुरु होते. त्यामुळे मृत्यू प्रमाणपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र ठरते.

कोणती कागदपत्रे लागतात?

नामांतरासाठी मृत्युपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, ओळख व पत्त्याचा पुरावा आणि मालमत्तेचे जुने कागदपत्र आवश्यक असू शकतात. जमिनीच्या बाबतीत सातबारा किंवा खाते उताराही मागितला जाऊ शकतो.

कुठे करायचा अर्ज?

शेतजमीन किंवा महसुली मालमत्तेसाठी तलाठी, तहसील कार्यालय किंवा संबंधित महसूल प्राधिकरणाकडे फेरफार नोंदीसाठी अर्ज करता येतो.

लगेच नाव होत नाही!

अर्जानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाते. संबंधित वारस किंवा व्यक्तींना नोटीस देऊन हरकती मागवल्या जाऊ शकतात. हरकत नसल्यास फेरफार प्रक्रिया पुढे जाते.

मृत्युपत्रावर आक्षेप घेतला तर?

मृत्युपत्र बनावट, दबावाखाली तयार केलेली किंवा कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचा दावा असल्यास वारस हरकत घेऊ शकतात. अशावेळी प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते.

महसूल अधिकारी काय ठरवतात?

महसूल अधिकारी सामान्यतः वसीयतची अंतिम वैधता किंवा मालकीचा वाद ठरवत नाहीत. मृत्युपत्रावर गंभीर वाद असल्यास सक्षम दिवाणी न्यायालयाचा मार्ग घ्यावा लागू शकतो.

मृत्युपत्र का महत्त्वाचं?

मृत्युपत्र केल्याने मृत्यूनंतर संपत्ती कोणाला मिळणार याबाबत स्पष्टता राहते. त्यामुळे कुटुंबातील संभाव्य वाद कमी होऊ शकतात. मात्र मृत्युपत्र असली तरी नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

Next : जनसेवेची 25 वर्षे पूर्ण! PM मोदींकडून विनायक मंदिरात प्रार्थना, पाहा PHOTOS

येथे क्लिक करा