MP K Suresh : लोकसभेत तब्बल आठ वेळा विजय, काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश का आहेत चर्चेत?

Roshan More

आठ वेळा विजय

केरळ राज्यातील काँग्रेसचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी यंदा आठव्यांदा लोकसभेत विजयी होण्याच्या विक्रम केला आहे.

MP K Suresh | sarkarnama

हंगामी अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी कोडीकुन्नील सुरेश यांचे नाव चर्चेत होते. सुरेश यांना हंगामी अध्यक्ष करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.

MP K Suresh | sarkarnama

दलित असल्यामुळे विरोध?

सुरेश हे दलित असल्याने त्यांना हंगामी अध्यक्ष भाजपने केले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रतिस्पर्धी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला.

MP K Suresh | sarkarnama

दोनदा पराभव

सुरेश सलग आठ वेळा विजयी झाले नाहीत. 1998 आणि 2004 मध्ये त्यांचा विजय खंडित झाला. त्यामुळे त्यांना हंगामी अध्यक्ष केले नाही, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

MP K Suresh | sarkarnama

1989 मध्ये पहिल्यांदा विजयी

सुरेश हे पहिल्यांदा 1989 मध्ये लोकसभेवर निवडून आले होते.

MP K Suresh | sarkarnama

केंद्रीय राज्यमंत्री

2009 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये सुरेश हे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री होते.

MP K Suresh | sarkarnama

सीपीआयचा पराभव

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेश यांनी सीपीआयच्या सी ए अरुण कुमार यांचा 10 हजार मतांनी पराभव केला.

MP K Suresh | sarkarnama

NEXT : सलग सात वेळा जिंकली लोकसभा निवडणूक, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब कोण?