BMC Mayor Honoured: मुंबईसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट; 'BMC'च्या महापौर रितू तावडेंचा उत्तराखंडमध्ये होणार सन्मान

Deepak Kulkarni

महापौरपदी

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 25 वर्षांनंतर एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

132 मधून विजयी

तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून विजयी झाल्या आहेत. बीएमसीच्या 2012 मधील निवडणुकीत पहिल्यांदा त्या निवडून आल्या होत्या.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

डॅशिंग राजकीय नेता

एक डॅशिंग राजकीय महिला नेता म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. त्यांनी मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समिती, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अशा संघटनात्मक पातळीवर काम केलं आहे..

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी

भाजपच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

दोन दिवसीय बैठक

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीची दोन दिवसीय बैठक उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे होत आहे.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

उत्तराखंडचे मुख्यमंत्री

या बैठकीला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मंत्री रामसिंह केडा हेही उपस्थित राहणार आहे.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

प्रमुख शहरांचे महापौर

तसेच अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीच्या या 3 व 4 जून रोजी होत असलेल्या या बैठकीला देशभरातील प्रमुख शहरांचे महापौर आणि उत्तराखंडामधील सर्व शहरांचे महापौर उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

अभिमानाची गोष्ट

यापूर्वी तावडे यांनी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष भूषवलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवर हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानं मुंबईसह महाराष्ट्र राज्यासाठीही ही अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.

BJP Mayor Ritu Tawde | Sarkarnama

NEXT: सुपरकॉप ते भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा; पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत?

K Annamalai news, Tamil Nadu BJP | Sarkarnama
येथे क्लिक करा...