Mangesh Mahale
महाराष्ट्रात दोन जागा रिक्त आहेत.त्यासाठी बैठकांचा सपाटा सुरु आहे.
तीन सप्टेंबरला ही निवडणुक होत आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
महायुतीत भाजपला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ, बाबा सिद्दीकी, आनंद परांजपे, नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपकडून विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, आशिष देशमुख आणि रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा
भाजपकडून पेण तालुक्याचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.
अजित पवार गटातून नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. यात नितीन पाटील यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते.