Pradeep Pendhare
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या नावावरून महाराष्ट्रातील राजकीय धुरळा उडाला असतानाच, त्यांचा राजकीय प्रवास चर्चेत आला आहे.
प्रफुल्ल पटेल वयाच्या 33 वर्षी राज्यसभेवर खासदार झाले होते. चार वेळा लोकसभेवर निवड झाली. 2000 आणि 2006, 2014, 2016, 2022, 2024 अशा 6 वेळा त्यांची राज्यसभेवरही निवड झाली.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडण्याआधी स्वतः शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष केलं. अजितदादांनी देखील त्यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपद ठेवलं.
प्रफुल्ल पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 कोलकाता इथला असून, त्यांचे वडील मनोहरभाई पटेल अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे आले.
मनोहरभाई पटेल काँग्रेसचे नेते होते. तोच वारसा प्रफुल्ल यांना मिळाला. राजकारणात प्रवेश करत, वयाच्या 28 व्या वर्षी ते गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.
राज्यसभा अन् लोकसभेवर निवड झाली. दिल्लीतील पाॅवरफूल नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शरद पवार यांनी त्यांचा नेटवर्कचा खुबीने दिल्लीत वापर करून घेतला.
प्रफुल्ल पटेल यांचा दिल्लीतल्या राजकारणातील वावर आणि प्रभाव आजही आहे. दरवर्षी त्यांच्या बंगल्यावर गेट टू गेदरला 'क्रीम ऑफ लुटन्स' असलेले सगळे असतात.
प्रफुल पटेल यांचे मोदी-शहांशी चांगले संबंध असून, थेट भेट आणि संवाद करू शकणं ही अजित पवारांसाठी उपयुक्तता होती.
प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर 8 महिन्यांनी पटेलांना हा दिलासा मिळाला.