Jagdish Patil
पुणे, अमरावती विभाग शिक्षक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या मंगळवारी (२७ ऑक्टोबर) होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर ही मतमोजणीची प्रक्रिया कशी राबवली जाते याबाबतची माहिती जाणून घेऊया.
सर्वप्रथम वैध मतपत्रिकांचे मतदारांनी दिलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारानुसार स्वतंत्र गठ्ठे तयार केले जातात.
जिंकण्यासाठी किती मते लागतात, हे काढण्यासाठी एकूण वैध मतांना २ ने भागून त्यात १ मिळवणे. हे सुत्र कोटा निश्चित करण्यासाठी वापरतात.
पहिल्या फेरीत 'पसंती क्रमांक १' मते मोजतात. पहिल्या फेरीत कोट्यापर्यंत न पोहोचल्यास कोणीही विजयी ठरत नाही.
दुसऱ्या फेरीत सर्वात कमी ‘पसंती क्रमांक १’ ची मते मिळालेल्या उमेदवाराला शर्यतीतून बाहेर केले जाते.
एकापेक्षा जास्त उमेदवारांना समसमान कमी मते मिळाली तर पुढील फेरीत कमी मते पडलेल्या उमेदवाराला बाद करण्यात येते.
बाद केलेल्या उमेदवाराला मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतपत्रिका तपासून त्या मतदारांनी 'पसंती क्रमांक २' ज्या उमेदवाराला दिला आहे. त्याच्या खात्यात ही मते जोडतात.
विजयाचा कोटा अपूर्ण राहिल्यास मोजणी तिसऱ्या फेरीत जाते. या तिसऱ्या फेरीत सर्वात कमी मते पडलेल्याला बाहेर काढले जाते.
मतपत्रिका तपासून त्यांच्यावर पुढचा पसंतीक्रम कोणाचा पाहतात आणि आवश्यक कोटा पार केलेल्या उमेदवाराला विजयी घोषित करतात.
एखादा उमेदवार पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा पूर्ण करू न शकल्यास जेवढी पसंती क्रमाची मते असतात, तेवढी सर्व मते मोजावी लागतात.
तरीही उमेदवाराला मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही तर सर्व मतांची मोजणी होऊन सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो.