शेतकऱ्यांनो सावधान, चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Roshan More

चारा वाहतुकीवर बंदी

पुणे जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्रकारांची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Pune Collector Bans Fodder Transportation

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

Pune Collector Bans Fodder Transportation

निर्णय का घेतला?

खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Pune Collector Bans Fodder Transportation

चारा टंचाई

भविष्यात जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

Pune Collector Bans Fodder Transportation

कोणाला सुट?

शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

Pune Collector Bans Fodder Transportation

कायदेशी कारवाई करणार

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Pune Collector Bans Fodder Transportation

NEXT : कोण आहेत IAS सौरभ कटियार? मिळाली 'एमपीएससी'ची जबाबदारी!

Sarkarnama
येथे क्लिक करा