सरकारनामा ब्यूरो
चार दशकांपासून पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या नाना पेठेत आंदेकर टोळीची दहशत आहे.
वत्सला आंदेकर (बंडूची बहीण) या १९९८-९९ मध्ये पुण्याची महापौर झाल्या. त्या “अक्का” म्हणून परिचित होत्या.
एका हत्या प्रकरणात या टोळीचा प्रमुख सूर्यकांत आंदेकर (बंडू आंदेकर) याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर उदय झाला तो वनराज आंदेकर याचा.
वनराज आंदेकर हा या टोळीचे प्रमुख झाला. त्याची साथ भाऊ कृष्णा आंदेकर देखील देवू लागला.
वनराज आंदेकर याचा चुलते उदयकांत आंदेकर हे देखील 1992 मध्ये नगरसेवक झाले.
वनराज आंदेकर याची आई राजश्री आंदेकर यादेखील 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका झाल्या.
वनराज आंदेकर यांनी देखील 2017 साली निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले.
सध्या जेलमध्ये असलेले बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांना पुणे महापाालिकेची निवडणूक लढविण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे.