Nilesh Ghaiwal : निलेश घायवळला परत आणण्यासाठी पोलिसांना करावी लागेल 'ही' प्रोसेस

Rashmi Mane

निलेश घायवळ

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर खून, खुनाचा प्रयत्नासह दोन डझनांहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून तो लंडनला पळाल्याची चर्चा होती. मात्र..

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

नवी माहिती समोर

मात्र, पोलिसांच्या तपासानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की घायवळ लंडनमध्ये नसून तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे. इतकंच नव्हे तर त्याचा मुलगाही तिथेच शिक्षण घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

‘प्रत्यार्पण प्रक्रिया’

मात्र, घायवळला भारतात परत आणणं इतकं सोपं नाही. कारण त्यासाठी पोलिसांना ‘प्रत्यार्पण प्रक्रिया’ (Extradition Process) पूर्ण करावी लागेल.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

न्यायालयीन दस्तऐवज

या प्रक्रियेनुसार, पहिल्यांदा भारतातील परराष्ट्र मंत्रालय त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधतात. त्यानंतर आरोपीविरुद्ध असलेली सर्व पुरावे, गुन्ह्याची माहिती आणि न्यायालयीन दस्तऐवज त्या देशाला दिले जातात.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

प्रत्यार्पण करार

मात्र प्रत्येक देशाचे वेगळे कायदे असतात. त्यामुळे प्रत्यार्पण तेव्हाच शक्य होते जेव्हा भारताने त्या देशाशी प्रत्यार्पण करार केले असेल.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

कायदेशीर प्रक्रिया

भारताने आतापर्यंत 40 हून अधिक देशांसोबत प्रत्यार्पण करार केले आहेत. यामध्ये स्वित्झर्लंडचाही समावेश आहे. म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास घायवळला भारतात आणणं शक्य होऊ शकतं.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

याआधीही झाली होती प्रत्यार्पण

यापूर्वीही भारताने अबू सालेम (2005) आणि छोटा राजन (2015) यांसारख्या गुन्हेगारांना परदेशातून भारतात आणलं आहे. त्यावेळीही हीच प्रक्रिया राबवण्यात आली होती.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

प्रत्यार्पण प्रोसेस

पुढील काही दिवसांत केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या माध्यमातून पोलिसांकडून प्रत्यार्पणासाठी औपचारिक पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

गुंतागुंतीची प्रक्रिया

यामुळे निलेश घायवळला परत आणण्यासाठी आता पोलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

Nilesh Ghaiwal extradition process | Sarkarnama

Next : 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येतील पीएफचे पैसे, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट!

येथे क्लिक करा