Aslam Shanedivan
हिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका काल रात्री हादरला. येथे कुख्यात गुंड आणि पैलवात सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाला आहे.
मोहळकर याने भर कुस्तीच्या मैदानात कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानाखाली मारली होती. ज्यानंतर तो राज्याभर चर्चेत आला होता.
मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला असून तो गंभीर जखमी झाला असून प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडल्या असून या हल्ल्यात त्याला पाच गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
मोहोळकरच्या तोंडाला दोन, डोळ्याला एक आणि छातीवर दोन अशा गोळ्या लागल्या असून पोलिस जामखेडसह अहिल्यानगर, पुणे, सोलापूर अन् बीड जिल्ह्यात हल्लेखोरांना शोध घेत आहेत.
दरम्यान कुख्यात गुंड निलेश घायवळच्या विरोधात सागर मोहोळकर याचे वडिलांनी २ दिवसांपूर्वी जामखेड पूर्णामध्ये गुन्हा दाखल केला होता.
मोहोळकर हा पैलवान असून त्याला काही वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. तो तुरुंगात होता. येथेही त्याने एकाचा खून केला होता.
शिक्षा भोगल्यानंतर काही दिवसांनी जेलमधून जामिनावर बाहेर येताच तो निलेश घायवळशी भिडला होता. त्याने घायवळच्या कानाखाली मारली होती
ही घटना एप्रिल २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेच्या दरम्यान घडली होती. येथे कुस्तीचा फड रंगला होता.