Aslam Shanedivan
NDA प्रवेश परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते.
विशेषतः मुलींसाठी ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असून प्रतिवर्षी तब्बल 1.5 लाखांहून अधिक मुली या परीक्षेला बसतात
पण या तीव्र स्पर्धेतून फक्त 27 मुलींनाच देशाची सेवा करण्यासाठी अंगावर वर्दी मिळते. अशीच वर्दी जिद्दी, कठोर परिश्रम ध्येयवेड्या मनाने पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडेने मिळवली आहे
ऋतुजाने फक्त NDAत प्रवेश मिळवला नाही तर तिने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला असून ती ऑल इंडिया रँक 3 आहे
तर अकादमीच्या 75 वर्षांच्या इतिहासात महिला उमेदवारांसाठी खुली असलेली पहिली बॅच ऋतुजाची आहे.
ऋतुजाला लहानपनापासून भारतीय सशस्त्र दलांच्या वर्दीकडे आकर्षित झाली होती. तेंव्हाच तिने आपले लक्ष केंद्रित केलं होतं.
ऋतुजा हिचे वडील संदीप वहऱ्हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक असून, आई जयश्री वऱ्हाडे या गणिताची शिक्षिक आहेत.
दहावीत 98 टक्के मिळवून बारावीनंतर एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या ऋतुजाची बंगळुरू बोर्डाकडून भारतीय सैन्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
तसेच म्हैसूर बोर्ड (AFSB) कडून सीपीएसएस परीक्षेसाठी ती पात्र झाली असून एअरफोर्स फ्लाइंग ब्रांचसाठी देखील वैद्यकीयदृष्ट्या ती तंदुरुस्त आहे.