Aslam Shanedivan
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात ६७, तर शिक्षक मतदारसंघात ४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
दरम्यान, या मतदारसंघातील मतदारांना मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याचा संकेतस्थळावरून घरबसल्या शोध घेता येणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मात्र, पूरक यादीमुळे पत्ता अथवा भाग क्रमांकामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने, अंतिमतः प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशिलाची खात्री करावी.
mahaelection.gov.in या संकेतस्थळावर ‘मतदार नोंदणी’ या पर्यायामध्ये जाऊन ‘पदवीधर’ किंवा ‘शिक्षक’ यापैकी संबंधित मतदारसंघाची निवड करावी.
येथे नाव शोधण्यासाठी अर्ज पोहोच क्रमांक, सध्याची मतदार यादी किंवा अंतिम मतदार यादीचा वापर करता येईल.
अर्ज पोहोच क्रमांक उपलब्ध नसल्यास जिल्हा, तालुका आणि मतदाराचे नाव टाकूनही मतदार यादीत नाव शोधता येईल.