Jagdish Patil
पुण्यातील जैन बोर्डिंग जागा प्रकरणात जैन मुनींनी लक्ष घातलं असून त्यांनी ट्रस्टी आणि बिल्डरला व्यवहार रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या बोर्डिंग प्रकरणामुळे जैन मुनी चांगलेच चर्चेत आलेत. याच पार्श्वभूमीवर जैन मुनींबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
जैन मुनींमध्ये श्वेतांबर, दिगंबर असे दोन संप्रदाय असतात. या संप्रदायातील मुनी आणि साध्वी दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कठोर जीवन जगतात.
जे जैन साधू कपड्यांशिवाय असतात त्यांना दिगंबर तर जे साधू कपडे घालतात त्यांना श्वेतांबर असं म्हटलं जातं.
दिगंबर जैन साधू कधीही कपडे घालत नाहीत. मात्र, जैन साध्वी केवळ सुती कापडाने आपले शरीर झाकतात.
जैन संप्रदायानुसार वस्त्रे आणि साहित्य आसक्ती निर्माण करतात ज्यामुळे मोक्ष प्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात म्हणून ते कपड्यांचा त्याग करतात.
जैन साधू दीक्षा घेतल्यानंतर कठोर जीवन जगतात. ते कपडे घालत नाहीत, दिवसातून एकदाच जेवतात. धक्कादायक बाब म्हणजे ते हातानेच डोक्याचे आणि दाढीचे केस काढतात.
शिवाय ते कधीही आंघोळ करत नाहीत आणि दात घासत नाहीत. आंघोळ केल्याने सूक्ष्मजंतूंचा जीव धोक्यात येतो, अशी त्यांची समज आहे.
तर सूक्ष्म जीव तोंडातून शरीरात जाऊ नये. म्हणून ते नेहमी तोंडावर कापड ठेवतात. शिवाय शरीराची दुर्गंधी येऊ नये यासाठी ते ओल्या कापडाने शरीर पुसतात.
जैन साधू आपल्यासोबत केवळ दोनच वस्तू घेऊन फिरतात. ज्यामध्ये मोरपंखांनी बनवलेला झाडू आणि कमंडलचा समावेश असतो.