Jagdish Patil
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयाकडून त्याबाबतचा फोन आल्यामुळे आता त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं.
मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोहोळ यांच्या कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ देखील पुण्यात प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कुस्तीसाठी कोल्हापूरला गेले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव, उपाध्यक्ष, शहर सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या.
2002 ते 2017 या कालावधित त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविलं आहे. तसंच पुणे महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष, 2019 ते 2022 कालावधीत महापौरपदाची जबाबदारी.
मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरुवातीपासून सुरु होत्या. त्यानुसार त्यांना तिकीट मिळालं आणि ते विजयीदेखील झाले.
लोकसभेतील विजयानंतर आता मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
NEXT : राणे, इराणींसह मोदी 2.0 मधील ‘या’ मंत्र्यांना पुन्हा लाल दिवा नाही...