पुणे-मुंबई प्रवास ३० मिनिटांनी कमी होणार! १ मे पासून 'मिसिंग लिंक' होणार खुली

Mangesh Mahale

अंतिम टप्प्यात

'मुंबई-पुणे मिसिंग लिंक' प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, १ मे २०२६ रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.

जलद मार्ग

खंडाळा घाटातील वळणावळणाचा रस्ता मागे पडून प्रवाशांना थेट आणि जलद मार्ग मिळणार आहे.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

जगातील सर्वात रुंद बोगदा

या मार्गावर २३.५ मीटर रुंदीचा जगातील सर्वात रुंद बोगदा बांधण्यात आला आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्याच्या तयारीत आहे.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

केबल-स्टेड पूल

टायगर व्हॅलीमध्ये उभारलेला ६५० मीटर लांब केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे १८२ मीटर उंचीवर आहे.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

मैलाचा दगड

६,६९५ कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा १३.३ किलोमीटरचा प्रकल्प आहे, देशाच्या पायाभूत सुविधांच्या नकाशावर एक मैलाचा दगड ठरणार आहे.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

६ किलोमीटर

मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होईल. एक्सप्रेसवेचे एकूण अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

दरडी

खंडाळा घाटातील तीव्र वळणे आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या भीतीपासून प्रवाशांची सुटका होईल.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

सुरक्षित

आधुनिक सुरक्षेच्या सोयींमुळे हा मार्ग अधिक सुरक्षित बनवण्यात आला आहे.

Pune Mumbai Missing Link | Sarkarnama

NEXT: उद्धव ठाकरेंसह 9 जणांची आमदारकी जाणार; अधिवेशनात आज त्यांचा निरोप समारंभ

येथे क्लिक करा