पुण्याचे सर्वात प्रामाणिक महापौर...पेट्रोलचा कोटा संपला म्हणून चालत जायचे महापालिकेत

Mangesh Mahale

महापौर

बाबुराव जगताप हे पुण्याच्या इतिहासात एक आदरणीय सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणप्रेमी आणि महापौर म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

गुरूवर्य

'गुरूवर्य बाबूरावजी जगताप'या नावाने ते प्रसिद्ध होते. पुण्याच्या मामलेदार कचेरीच्या आवारात त्यांचा पुतळा आहे. 1962 मध्ये नागरी संघटनेकडून ते पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाले होते.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

पेट्रोल

महापौरपदी असताना बाबूराव जगताप यांच्याकडून महापालिकेचा पेट्रोलचा कोटा जास्त वापरला गेला. त्यांनी पुढील सहा महिने महापौरांची गाडी वापरली नाही. महापालिकेतून ते घरी पायी चालत जात असत.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

टेलिफोन

घरात बसवलेला टेलिफोन खासगी कामासाठी वापरला तर त्यासाठी त्या गल्ल्यामध्ये 15 ते 25 पैसे टाकायचे, ते पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा करीत असत.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

‘श्री शिवाजी मराठा शाळा’

बडोद्या येथील सरकारची नोकरी सोडून त्यानी १९१८ मध्ये शुक्रवार पेठेत ‘श्री शिवाजी मराठा शाळा’ सुरू केली. विविध संस्थांची स्थापना त्यांनी केली.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

'मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड'

'श्री शिवाजी मराठा सोसायटी' आणि 'मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड','महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृमंडळ' या संस्था त्यांनी स्थापन केल्या.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

‘शिक्षक’

‘शिक्षक’ नावाचे मासिक १९२० मध्ये सुरू केले आणि ते ४४ वर्षे अखंडपणे चालविले . तरुण विद्यार्थ्यांसाठी ‘मन्वंतर वाचनमाला’सुरु केली होती.

Late Former Pune Mayor Guruvarya Baburao Jagtap | Sarkarnama

NEXT: पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा! शरद पवारांच्या आमदार पुत्राकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू

येथे क्लिक करा