सरकारनामा ब्यूरो
महिला मतदारांची संख्या ४.६ कोटी तर पुरुष मतदारांची संख्या ४.९ कोटी आहे.सध्या स्त्री-पुरुष गुणोत्तर ९२५:९३३ आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक (८६ लाख) मतदार आहेत.
मुंबई उपनगरे (७५.८ लाख) आणि ठाणे (७० लाख) आहेत.
गडचिरोलीमध्ये राज्यात सर्वात कमी (८.१ लाख) मतदार आहेत.
३० ते ३९ आणि ४० ते ४९ वर्षे या वयोगटात सर्वाधिक म्हणजेच २ कोटींहून अधिक मतदार आहेत.
२० ते २९ वयोगटातील १.८ कोटी मतदार आहेत. ८० आणि त्यावरील वयोगटातील २५.४ लाख मतदार आहेत.
१८ ते २८ या वयोगटात १८.६ लाख मतदार आहेत
महाविद्यालये आणि संस्थांच्या मदतीने नवीन मतदारांची नोंदणी केल्यामुळे ३.७ लाख मतदारांची वाढ झाली आहे.