Deepak Kulkarni
पुणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रासह देशातील सर्वात Top आणि महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनपैकी एक मानले जाते.
पुणे रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे प्रवाशांसह इतर नागरिकांचीही तितक्याच मोठ्या प्रमाणात कायम गर्दी दिसून येते.
मात्र, आता पुणे रेल्वेकडून दिवाळी तसेच उत्तर भारतातील छठपूजेसारखा सणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे.
येत्या 1 ते 15 नोव्हेंबर या काळात प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री मर्यादित करण्याचा निर्णय पुणे रेल्वे विभागानं घेतला आहे.
पुणे रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या कालावधीत ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुले यांसह प्रवास करणाऱ्यांना मदत करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनाच प्लॅटफॉर्म तिकिटं उपलब्ध असणार आहेत.
येत्या काळात दिवाळी आणि छठपूजेनिमित्त होणार्या गर्दीमुळे होणारे संभाव्य अपघात किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
वैयक्तिकरित्या स्वतःचा प्रवास करू न शकत नसलेल्यांसोबतच्या एकाच मदतनीस व्यक्तीला पुणे रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाणार आहे.
याच प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीच्या निर्णयासह प्रशासनानं पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीचं नियोजन केलं आहे.
स्टेशनवरील 'एन्ट्री तसेच एक्झिट'च्या व्यवस्थेतही काही बदल केल्याचं समोर येत आहे.