Pradeep Pendhare
पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिनं सासरच्या छळामुळे आत्महत्याच्या प्रकारानं राज्यात संतापाची लाट आहे.
महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 मध्ये महाराष्ट्र अधिनियम 1993 मधील तरतुदींनुसार झाली.
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
आयोगामध्ये अध्यक्षांसह सहा अशासकीय सदस्य असतात, यात एक सदस्य सचिव आणि पोलिस महासंचालकांचा समावेश असतो.
महिलांची समाजामधील स्थिती, प्रतिष्ठा, अनिष्ठ प्रथा मोडून काढणे, संरक्षणासाठी कायद्यांची प्रभावी अमंलबाजवणी करणे हे आयोगाचं उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर असून, त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 31 जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990 नुसार झाली.