Vasant More : वसंत मोरे यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

Akshay Sabale

18 वर्षांनंतर स्वगृही -

वसंत मोरे यांनी शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश केला आहे. 18 वर्षांनंतर मोरे स्वगृही परतले आहेत. त्यानिमित्त मोरे यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊया..

vasant more | sarkarnama

शाखाप्रमुख -

1993 मध्ये वसंत मोरे पहिल्यांदा शाखाप्रमुख झाले. त्यानंतर ते कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख होते.

vasant more | sarkarnama

पहिल्यांदा नगरसेवक -

2006 ला राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर 2007 ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आले.

vasant more | sarkarnama

विरोधी पक्षनेते -

2012 मध्ये देखील मोरे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवकांची संख्या वाढल्याने ते महापालिकेत विरोधी पक्षनेते झाले.

vasant more | sarkarnama

गटनेते -

2017 मध्ये वसंत मोरे यांनी तिसऱ्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. यावेळी मनसेचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले. तेव्हा, वसंत मोरे यांना मनसेचे गटनेते करण्यात आलं.

vasant more | sarkarnama

स्मार्ट सिटी सदस्य -

नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी स्थायी समितीचे सदस्य पद, स्मार्ट सिटी सदस्य अशा पदांवर काम केलं.

vasant more | sarkarnama

मनसेला राम-राम -

2021 मध्ये राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना बोलवून पुणे शहराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. पण, 12 मार्च 2024 मध्ये मोरे यांनी मनसेला 'राम-राम' ठोकला.

vasant more | sarkarnama

निवडणुकीत पराभव -

2024 च्या लोकसभा निवडणूक मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढली. मात्र, या निवडणुकीत मोरे यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही.

vasant more | sarkarnama

शिवसेनेत प्रवेश -

18 वर्षानंतर पुन्हा मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ते खडकवास किंवा हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

vasant more | sarkarnama

NEXT : वरळी 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात चर्चेत आलेले राजेश शाह कोण?