Anju Mane Story: पैसा पाहिला की, भल्या-भल्यांची मती फिरते; पण 10 लाख हातात आल्यानंतरही महिलेनं जे केलं त्यासाठीच ठोकाल 'सॅल्यूट'!

Deepak Kulkarni

ऐशोरामाचं जीवन

हल्लीच्या काळात कमी कष्ट, भरपूर पैसा अन् ऐशोरामाचं जीवन बऱ्याच जणांना हवं असतं.

waste collector woman anju mane | Sarkarnama

कौतुकास्पद घटना

एकमेकांना संपत्तीसाठी संपवण्यात आल्याच्या अनेक घटना घडतात. अशा समाजात काही कौतुकास्पद घटनाही आजूबाजूला घडत असतात.

waste collector woman anju mane | Sarkarnama

पैशांपेक्षा माणुसकी,प्रामाणिकपणाच सर्वश्रेष्ठ

पण आजही पैशांपेक्षा माणुसकी,प्रामाणिकपणाच सर्वश्रेष्ठ आहे हे सिध्द करणारी घटना समोर आली आहे.

waste collector woman anju mane | Sarkarnama

10 लाखांची रोकड असलेली बॅग

पुणे शहरात कचरा वेचणाऱ्या एका महिलेला तब्बल 10 लाखांची रोकड असलेली बॅग सापडली

waste collector woman anju mane | Sarkarnama

प्रामाणिकता जपली.

बॅगेत एकदम 10 लाख रुपये दिसताच कुणाचीही मती फिरली असती, पण या महिलेनं मोहाला बळी न पडता आपल्यातला प्रामाणिकता जपली.

waste collector woman anju mane | Sarkarnama

गेल्या वीस वर्षांपासून सदाशिव पेठ भागात काम

अंजू माने असं या प्रामणिक कचरा वेचक महिला सेविकेचे नाव आहे. त्या गेल्या वीस वर्षांपासून सदाशिव पेठ भागात काम करत असतात.

waste collector woman anju mane | Sarkarnama

झाला समज

दोन दिवसांपूर्वी कचरा वेचत असताना त्यांना एक बॅग सापडली होती. हॉस्पिटल जवळ असल्याने त्यांनी ती कुणाचीतरी औषधांची बॅग असेल असं समजून बॅग आपल्याजवळ ठेवली.

waste collector woman anju mane | Sarkarnama

बॅगेत तब्बल 10 लाख

पण त्यांनी जेव्हा बॅग उघडली,तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला,कारण बॅगेत तब्बल 10 लाख रुपये होते.

waste collector woman anju mane | Sarkarnama

घाबरलेली एक व्यक्ती

त्यांनी बॅग परत करण्यासाठी शोध सुरु केला. याचवेळी घाबरलेली एक व्यक्ती त्यांना दिसली.सापडलेली बॅग त्यांचीच असल्याची खात्री करत त्यांना दहा लाख रक्कम परत केले. त्यांच्या या प्रामणिकपणाची सोशल मीडियावर चर्चा आहे. साडीसह रोख रक्कम देत त्यां: चा सत्कारही केला. 

waste collector woman anju mane | Sarkarnama

NEXT: नागपुरचा वेग आणखी वाढणार : गडकरींचा क्रांतिकारी प्रोजेक्ट

Trolly-Bus-1 (1).jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...