सरकारनामा ब्यूरो
आयपीएस ज्योती यादव सध्या पंजाबमधील मानसा येथे SP (Superintendent of police) म्हणून तैनात आहेत.
पंजाब केडरच्या आयपीएस यादव याआधी लुधियानामध्ये ADCP (Additional Deputy Commissioner Of Police) होत्या.
पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यापासून त्या चर्चेत आल्या आहेत.
त्या मूळच्या हरियाणातील गुडगाव येथील आहेत.
गुरुग्रामच्या शेरवुड पब्लिक स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. बारावीनंतर BDS (Bachelor of Dental Surgery) चे शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या.
डॉक्टर बनल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि 437व्या रँकसह परीक्षा पास केली.
ज्योती यादव यांची गणना देशातील प्रखर आणि लोकप्रिय महिला आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ज्योती यांचे इन्स्टाग्रामवर सुमारे 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
देश-विदेशात फिरण्याबरोबर त्यांना चित्रकलेचीदेखील प्रचंड आवड आहे.
R