Jagdish Patil
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर 'टीएमसी' पक्षात मोठी फूट पडली आहे.
बंड केलेल्या 59 आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ममता यांना मोठा धक्का बसला आहे.
अशातच टीएमसीचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
जेष्ठ नेते रॉय यांच्या राजीनामा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नुकतंच रॉय यांनी आपण शारीरिकदृष्ट्या टीएमसीत असलो तरी मानसिकदृष्ट्या पक्ष सोडल्याचं म्हटलं होतं.
रॉय यांनी 2024 मध्ये आर.जी. कर मेडिकल मधील बलात्काराच्या घटनेनंतर पक्षाच्या विघटनाचा अंदाज वर्तवला होता.
TMC विखुरली जाईल, असे मी आधीच सांगितले होते. आता नेमकं तेच घडत असल्याचं रॉय यांनी म्हटलं आहे.
TMC ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार असलेले 77 वर्षीय रॉय हे बंगालच्या राजकारणातील दिग्गज नेते मानले जातात.
व्यवसायाने वकील असलेल्या रॉय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीतून केली, त्यांनी काँग्रेससोबतही काम केलंय.
रॉय यांची 2011 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली होती आणि त्यानंतर 2017 व 2023 मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले.