Rashmi Mane
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर 'भारतरत्न' आज जाहीर करण्यात आला.
पी. व्ही. नरसिंह राव यांना 'भारतातील आर्थिक उदारीकरणाचे जनक' म्हणून ओळखले जाते.
नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव पामुलापर्थी व्यंकट नरसिंह राव होते.
हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले.
व्यवसायाने कृषी तज्ज्ञ आणि वकील असलेल्या राव यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला.
नरसिंह राव 10 भाषा बोलू शकत होते आणि अनुवादातही ते निष्णात होते.
नरसिंह राव 1957 ते 1977 पर्यंत आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते, 1977 ते 1984 पर्यंत लोकसभेचे सदस्य होते आणि डिसेंबर 1984 मध्ये ते रामटेकमधून आठव्या लोकसभेवर निवडून आले होते.
ते भारतीय विद्या भवनच्या आंध्र केंद्राचे अध्यक्षही होते. राव यांनी परराष्ट्र मंत्री, 19 जुलै गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री म्हणूनही पदे भूषवली आहेत.
R