Rashmi Mane
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवरील श्वेतपत्रिका संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सादर केली.
यावर आज संसदेत चर्चा होणार आहे. एनडीए सरकारच्या आणि यूपीए सरकारच्या दहा वर्षांशी तुलना करण्यासाठी श्वेतपत्रिका आणण्याची घोषणा मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केली होती.
श्वेतपत्रिका काय आहे आणि मोदी सरकारने ती संसदेत का आणली आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
श्वेतपत्रिका हा सरकारी दस्तावेज आहे. याद्वारे सरकार आपली धोरणे आणि उल्लेखनीय कामे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दावा केला होता की, 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था 'संकटात' होती.
श्वेतपत्रिकेद्वारे मोदी सरकार यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळातील अर्थव्यवस्थेची आणि एनडीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळाची तुलना करणार आहे.
श्वेतपत्रिकेत भारत सरकारच्या गेल्या काही वर्षांतील एकूण आर्थिक धोरणाचे वर्णन, मूल्यमापन आणि विश्लेषण केले जाणार आहे.
R