QR code scam : QR कोड स्कॅन करताय? सावधान! 'या' 3 गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमची एक चूक पडू शकते महागात

Rashmi Mane

QR कोड स्कॅन करताय? सावधान!

आजकाल पेमेंट खूप सोपं झालंय पण मोबाईल उचलला, QR कोड स्कॅन केला आणि पैसे ट्रान्सफर होतात. पण हीच सोपी पद्धत आता फसवणूक करणाऱ्यांचं मोठं हत्यार बनली आहे.

छोटी चूक, मोठं नुकसान

अनेकजण न विचारता कुठलाही QR कोड स्कॅन करतात. “स्कॅन करा, पैसे मिळतील” असं सांगितलं की लोक लगेच विश्वास ठेवतात आणि इथेच फसवणूक होते.

महत्वाची गोष्ट समजून घ्या

QR कोडचा वापर पैसे पाठवण्यासाठी होतो, घेण्यासाठी नाही. ही साधी गोष्ट लक्षात ठेवली, तर अनेक स्कॅम टाळता येतात.

पहिली गोष्ट तपासा

तुम्ही पैसे पाठवत आहात की मिळवणार आहात? गोंधळ इथेच होतो. घाईत किंवा लालसेमुळे लोक चुकीचा निर्णय घेतात.

पिनबाबत सावध रहा

पैसे मिळवण्यासाठी कधीही UPI पिन टाकावा लागत नाही. जर स्कॅन केल्यानंतर पिन टाकायला सांगितलं, तर समजा पैसे तुमच्याच खात्यातून जाणार आहेत.

QR कोड खरा आहे का?

आजकाल बनावट QR कोड मोठ्या प्रमाणात वापरले जातात. दुकानातील मूळ कोडवर स्टिकर लावून फसवणूक केली जाते.

स्कॅन करण्याआधी तपासा

कोड वाकलेला, उखडलेला किंवा वरून चिकटवलेला दिसत असेल तर सावध राहा. स्कॅन केल्यावर दिसणारं नाव दुकानाच्या नावाशी जुळतंय का ते नक्की तपासा.

स्कॅमपासून स्वतःला वाचवा

रिवॉर्ड मिळेल, पेमेंट पेंडिंग आहे, अशा गोष्टींना बळी पडू नका. थोडा विचार करूनच स्कॅन करा कारण तुमची एक चूक महागात पडू शकते!

Next : 500 रुपयांचा गॅस मोफत, सिक्युरिटी फी माफ; PNG साठी कंपन्यांचा निर्णय काय? 

येथे क्लिक करा