Jagdish Patil
भारत छोडो आंदोलनाला शुक्रवारी (ता.09) 83 वर्षे पूर्ण झाली. ब्रिटिशांना देशातून हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेले हे शेवटचे आंदोलन ठरले.
भारत छोडो आंदोलनाला "ऑगस्ट क्रांती" आंदोलन असंही म्हणतात. ते महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात मुंबईतील एका मैदानातून 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालं होतं.
यावेळी गांधीजींनी 'करो या मरो' असा नारा देत तरुणांना ब्रिटिशांना देशातून हाकलण्याचं आवाहन केलं. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
ब्रिटिशांनी भारत सोडला नाही तर त्यांच्याविरुद्ध देशव्यापी सविनय कायदेभंग करण्याचा ठराव 4 जुलै 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मंजूर केला.
भारताची मागणी होती की ब्रिटनने भारताला अहिंसक पद्धतीने युद्धाविरुद्ध प्रचार करण्यास स्वातंत्र्य असल्याचं घोषित करावं. तरच सविनय कायदेभंग आंदोलन होणार नाही.
पण मागणी फेटाळली तर काँग्रेसकडे दुसरा पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, ही चळवळ सुरू होताच ब्रिटिशांनी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करत काँग्रेस पक्षावर बंदी घातली.
यात एक लाखाहून अधिक लोकांना अटक केली. तर हिंसाचारात शेकडो जणांचा मृत्यू झाला. अनेक राष्ट्रीय नेते भूमिगत झाले पण त्यांनी समांतर सरकार स्थापन करून संघर्ष सुरूच ठेवला.
काँग्रेस नेतृत्वाने 3 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. काही महिन्यांत गांधीजींच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर गांधींची प्रकृतीही ढासळली. तरीही त्यांनी 21 दिवस उपवास केला.
1944 मध्ये, ब्रिटिशांनी गांधीजींना आजारपणामुळे सोडले, परंतु त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या सुटकेची मागणी करत प्रतिकार सुरूच ठेवला.
1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपत आले तेव्हा ब्रिटनच्या लेबर पक्षाने भारताला स्वातंत्र्य देण्याच्या आश्वासनावर निवडणुका जिंकल्या. आणि चळवळीला घाबरलेल्या ब्रिटिशांनी राजकीय कैद्यांची सुटका केली.