Rashmi Mane
UPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि अनेक वर्षांपासून विद्यार्थी त्यासाठी तयारी करतात.
परंतु, काही उमेदवार असे आहेत जे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात. अशीच एक कहाणी आहे, राजस्थानच्या चुरू येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या शेओरनची.
ज्यांनी मॉडेलिंग सोडून UPSC परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून IAS अधिकारी बनल्या.
एवढेच नाही तर ऐश्वर्या 2014 मध्ये दिल्लीच्या क्विन अँड क्लीयर फेस फ्रेश आणि 2016 मध्ये फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट राहिली आहे.
राजस्थानच्या चुरू येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या शेओरानने कोचिंगशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
त्यांनी 10 महिने घरीच तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात 93 वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्यात यशस्वी ठरली.
ऐश्वर्या शेओरान यूपीएससी परीक्षा देण्यापूर्वी मॉडेलिंग करत होत्या. त्यांनी सांगितले की मॉडेलिंग ही त्यांची आवड होती, परंतु यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे त्यांचे ध्येय होते.
2018 मध्ये त्यांनी तयारी सुरू केली आणि यशही मिळवले.