Jagdish Patil
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबतचा वाद वाढल्यानंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
सरकारने CBSE च्या अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवून चौकशी समिती स्थापन केली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त IAS अधिकारी एस. राधा चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव लक्षात घेता केंद्राने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
तर सध्या कैपिसिटी बिल्डिंग कमीशनच्या अध्यक्षा असलेल्या चौहान यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
चौहान या 1988 बॅचच्या UP कॅडरच्या IAS असून 30 जून 2025 रोजी कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या सचिव पदावरून त्या निवृत्त झाल्या.
कायद्याच्या पदवीधर असलेल्या चौहान यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला व बालविकास अशा क्षेत्रांत काम केलं आहे.
तसंच गाझियाबादच्या आयुक्त, नोएडा प्राधिकरणाच्या CEO, ग्रेटर नोएडाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलंय.
मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातही संयुक्त सचिव म्हणून काम केलं आहे.
त्यानंतर राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स प्रभागाच्या अध्यक्षा आणि CEO पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवामुळे CBSE च्या OSM वादाच्या चौकशीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.