"तू वेडा झाला आहेस, मी नसतो तर तू तुरुंगात असतास...", इराण युद्ध पेटवणाऱ्या नेत्यानाहू यांना ट्रम्प यांनी फोनवरून झापलं

Jagdish Patil

इस्रायल

इराण-अमेरिकेदरम्यान शस्त्रसंधीची चर्चा सुरू असचानाच इस्रायलने लेबनॉनवर सशस्त्र कारवाई करण्याची तयारी केली होती.

Benjamin Netanyahu | Sarkarnama

करार

इस्रायल सैन्याला लेबनॉनमध्ये शिरण्याचे आदेश दिल्याने इराण-अमेरिकेतील शस्त्रसंधीचा करार धोक्यात आला होता.

Israel Lebanon Conflict | Sarkarnama

हल्ले

इस्रायलने हे हल्ले थांबवले नाहीत, तर अमेरिकेसोबतचा शस्त्रसंधी करार संपुष्टात येऊ शकतो, असं वृत्त इराणच्या सरकारी वाहिनीने दिलं.

Benjamin Netanyahu | Sarkarnama

डोनाल्ड ट्रम्प

या सर्व घडामोडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

Donald Trump | Sarkarnama

नाराजी

यावेळी संतापलेल्या ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नेतान्याहू यांना चांगलंच झापल्याची माहिती समोर आली आहे.

Trump Netanyahu Clash

वेडा

यावेळी ट्रम्प नेतान्याहू यांना, "तू पूर्णपणे वेडा आहेस. जर मी नसतो तर तू तुरुंगात असतास", असं म्हटलं आहे.

Trump Netanyahu Clash

तिरस्कार

'शिवाय मी तुला वाचवत आलो आहे. तुझ्या कृतीमुळे प्रत्येकजण तुझा तिरस्कार आणि इस्रायलचा द्वेष करु लागलंय.'

Israel | Sarkarnama

वृत्त

अशा शब्दांत ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना अरेतुरे करत झापल्याचं वृत्त ॲक्सिओसने दिलं आहे.

Donald Trump | Sarkarnama

आठवण

तसंच भ्रष्टाचार प्रकरणात मी पाठिंबा दिल्याने तू तुरुंगात जाण्यापासून वाचला, अशी आठवणही ट्रम्प यांनी यावेळी करून दिली.

Trump Netanyahu Clash

भूमिका

तर दोघांमधील फोननंतर 'हिजबुल्लाने हल्ले न थांबवल्यास इस्रायलही बैरूतवरील हल्ले करेल हीच आमची भूमिका कायम असेल असं नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे.

Trump Netanyahu Clash

NEXT : एकनाथ शिंदेंचं अल्पसंख्यांक कार्ड : आजी-माजी आमदारांना मागे टाकून उमेदवारी मिळवलेले सईद खान कोण?

Saeed Khan Shivsena MLC Candidate | Sarkarnama
क्लिक करा