Rashmi Mane
युद्धबंदीच्या घोषणेसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह कमांडर रघु आर नायर देखील उपस्थित होते. नायर यांनीही युद्धबंदीबद्दल बोलताना पाकिस्तानला कडक इशारा दिला.
भारतीय नौदलाचे शौर्यवान अधिकारी — कमांडर नायर हे नौदलातील वरिष्ठ पातळीवर कार्यरत असलेले अधिकारी आहेत.
त्यांनी आयएनएस चेन्नई या अत्याधुनिक स्टेल्थ क्षेपणास्त्र नाशक जहाजाचे नेतृत्व केले आहे
नौदल ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून त्यांनी धोरणात्मक पातळीवर नेतृत्वाची धुरा वाहिली आहे.
12 ते 16 जुलै दरम्यान आयएनएस चेन्नईसह फ्रान्समधील बॅस्टिल डेला येथे अधिकृत दौरा केला.
समुद्री चाचेगिरीविरोधातील ऑपरेशन्समध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली.
त्यांच्या असामान्य सेवा आणि योगदानाबद्दल त्यांना 76व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते नौदल सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे.