Raghuji Bhonsle Sword : मराठा साम्राज्याचा गौरवशाली ठेवा; अखेर रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रात

Rashmi Mane

ऐतिहासिक तलवारीची परतफेड

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक सरदार रघुजी भोसले यांची तलवार आता महाराष्ट्रात परत येणार!

लंडनमधून ताब्यात

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये जाऊन ही तलवार ताब्यात घेतली आहे.

लिलावातून विकत

महाराष्ट्र सरकारने ही तलवार लिलावातून विकत घेतली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे परदेशातील वस्तू परत आणली गेली.

18 ऑगस्टला मुंबईत येणार

ही तलवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईत दाखल होईल.

भव्य बाईक रॅली

मुंबई विमानतळावरून दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीपर्यंत भव्य बाईक रॅली काढली जाणार आहे.

रघुजी भोसले कोण होते?

रघुजी भोसले (1695-1755) हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक व छत्रपती शाहू महाराजांचे विश्वासू सरदार होते.

सेनासाहिबसुभा पदवी

रघुजी भोसले यांची शौर्य आणि युद्धनीती पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना 'सेनासाहिबसुभा' ही पदवी दिली होती.

मराठा साम्राज्याचा विस्तार

रघुजी भोसले यांनी बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, संबळपूर आणि दक्षिण भारतात मराठा साम्राज्याचा दबदबा निर्माण केला.

Next : अतिदुर्मिळ 'प्रोपेक्स जर्देनियाना' ऑर्किड पाहिले आहे का?... नाशिकमध्ये लागला आहे त्याचा शोध...

येथे क्लिक करा