Sampat Devgire
नाशिकच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी अद्वितीय कामगिरी केली आहे. जैवविविधतेत एक अभिमानाचा क्षण म्हणून त्याची नोंद झाली आहे. ऑर्किड प्रजातीचे अत्यंत दुर्मिळ रान फुल शोधले आहे.
भारतातील अन्य भागात ही वनस्पती प्रामुख्याने मोठ्या वृक्षांवर आधार घेऊन वाढते. नाशिकला समुद्रसपाटीपासून 722 मीटर उंचीवर थेट खडकावर ही वनस्पती आढळली आहे.
ही प्रजाती भारतीय उपखंडात आढळते. अतिशय देखणी रचना असलेले हे फुल प्रामुख्याने दक्षिण भारत आणि उत्तर अंदमान येथे आढळते.
अर्धा ते एक सेंटीमीटर आकाराची बटणासारखी गाठी सदृश्य आणि तंतुमय जाळ्याने झाकलेली असते. सुंदर नक्षीदार, कृती पाने आणि फुलपाखरासारखा भास व्हावा असा फुलोरा त्यात असतो.
प्रोपॅक्स जर्देनियाना लहान फुलोऱ्या स्वरूपात हे फुल जून ते जुलै दरम्यान येते. जागतिक दर्जाच्या IUCN Red list नुसार Vulnerable असा तिचा दर्जा आहे. नाशिकच्या संशोधकांनी केलेल्या या कामाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.
वैतरणा (नाशिक) धरणालगतच्या डोंगरावर मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या डॉ ज्ञानेश्वर खांडबहाले फुल शोधले आहे.
धरणालगतच्या डोंगरावर खांडबहाले यांच्यासोबत विद्यार्थी कन्हैया थेटे, हेमंत चौरे या चमूने ढोऱ्या डोंगरावर अत्यंत असुरक्षित आणि दुर्मिळ 'प्रोपॅक्स जर्देनियाना' स्थानिक भाषेत फुलपाखरू अमरी हे अतिदुर्मिळ, अति असुरक्षित ऑर्किड प्रजातीचे फुल शोधण्यात यश मिळवले आहे.