सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशी समाजवादी पक्षाच्या आमदार रागिनी सोनकर यांनी प्रश्नांचा भडीमार करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सळो नाकी नऊ आणले होते. जाणून घेऊयात त्या.
विधानसभाच्या सदस्य रागिनी सोनकर यांनी यावेळी कृषी, रोजगार आणि उद्योगाबाबत मोठे भाषण दिले आहे.
रागिनी सोनकर यांनी त्यावेळी अर्थव्यवस्थेपासून ते इन्कम टॅक्स प्रर्यतच्या महत्वाच्या विषयावर प्रश्न विचारत मुख्यमंत्री योगींना अडचणीत टाकले होते. जाणून घेऊ त्यांचे शिक्षण किती झाले आहे.
वाराणसी येथील रहिवासी असलेल्या रागिनी या वाराणसीच्या अजगरा मतदारसंघाचे आमदार कैलाश सोनकर यांच्या कन्या आहेत.
अभ्यासात प्रचंड हुशार असलेल्या रागिनींनी त्याचे शिक्षण कोलकाता येथून पूर्ण केले. त्यांनी प्रसिध्द आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले आहे.
दिल्लीतील AIIMS येथून त्यांनी नेत्र चिकित्सक म्हणून डिग्री मिळवली. यानंतर त्यांनी अनेक दिवस कोलकाता येथील रुग्णालयातचं काम केले.
2020ला फेब्रुवारीमध्ये रागिनी यांनी व्यवसायाने डॉक्टर असलेले संबित मलिक यांच्याशी लग्न केले.