जन्म दाखल्यासाठी 500 रुपयांची लाच मागितल्याने वाईट वाटले अन् IPS झाल्यावर त्यानेच थेट 1 कोटी मागितले...

Rajanand More

ट्रेनी IPS चा कारनामा

छत्तीसगड केडरच्या २०२२ च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी IPS आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर सायबर फसवणुकीचे प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

प्रकरण CBI कोर्टात

दिल्लीतील विशेष CBI कोर्टात हे प्रकरण पोहोचले असून, कोर्टाने छत्तीसगडचे DGP आणि CBI संचालकांकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

राहुल बन्सल

आरोपींमध्ये ट्रेनी IPS अधिकारी राहुल बन्सल यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण कुमार राठोड आणि कॉन्स्टेबल अंशुल शर्मा यांची नावे आहेत.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

पुरावे सादर

तिघांची तक्रार करणाऱ्या व्यक्तीने लाचेचे पुरावे म्हणून कथित व्यवहाराशी संबंधित WhatsApp चॅटचे स्क्रीनशॉट आणि कॉल रेकॉर्डिंग आदी डिजिटल पुरावे कोर्टात सादर केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

प्राप्तीकर अधिकारी

राहुल बन्सल हे IPS सेवेत येण्यापूर्वी राज्यात प्राप्तीकर निरीक्षक होते. IPS चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली फील्ड पोस्टिंग सरगुजा जिल्ह्यात CSP म्हणून करण्यात आली आहे.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

पहिली पोस्टिंग वादात

सायबर फसवणुकीशी संबंधित प्रकरणात आरोपींकडून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. एवढेच नाही तर ही रक्कम स्वीकारण्यात आल्याचा दावाही तक्रारदाराने केल्याने खळबळ उडाली आहे.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

दोन हप्त्यांत दिली रक्कम

तक्रारदाराने ५०-५० लाखांच्या दोन हप्त्यांत आरोपींना रक्कम दिल्याचा दावा केला आहे. ही रक्कम हवाला माध्यमातून हस्तांतरित केल्याचा खळबळजनक दावाही त्याने केला आहे.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

पोलीस दल हादरले

बन्सल यांनी यूपीएससीची तयार करत असताना एका मुलाखतीत आपल्या भावाकडे जन्म दाखल्यासाठी 500 रुपयाची लाच मागितल्याचे सांगितले होते. त्यामुळे खूप वाईट वाटल्याचेही ते म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

IPS Rahul Bansal | Sarkarnama

NEXT : 'Organic'च्या नावाखाली भेसळ तर नाही ना? ओळखणं आहे सोपं, 'हे' तीन लोगो तपासा...

येथे क्लिक करा.