Aslam Shanedivan
भारतासह जगभरात द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविड आणि गळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाचे एक अतूट नातं आहे
राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीची सुरुवात याच मैदानावरून करत कर्नाटककडून खेळताना धावांचे डोंगर उभा केला
याच मैदानावर सुरूवात केलेल्या राहुल द्रविडने जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नाव कमावलं
आता याच स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला अधिकृतपणे ‘राहुल द्रविड एंड’ असे नाव देण्यात आले आहे.
या सन्मानानंतर द्रविडने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, हे स्टेडियम म्हणजे केवळ सिमेंटचे बांधकाम नाही तर ते दुसऱ्या घरासारखं आहे
यावेळी त्याने अनिल कुंबळे याचा संदर्भ दिला. तसेच तो म्हणाला, आज मी जो कोणी आहे, यात मैदानाचा आणि KSCA मोठा वाटा आहे
यावेळी द्रविडने वडील शरद द्रविड यांची आठवण काढत क्रिकेट प्रवासात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा उल्लेख केला.
द्रविडने माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद आणि KSCA चे आभार मानत हा सन्मान कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे