Roshan More
उद्धव ठाकरेंचे छोटे चिरंजीव तेजस ठाकरे हे रुग्णालयात दाखल आहेत.
तेजस ठाकरेंची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात मागील तीन दिवसांपासून अॅडमीट केले आहे.
मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
तेजस ठाकरे हे अनेकदा उद्धव ठाकरेंच्या सभेला दिसून येतात. मात्र, ते राजकारपासून दूर आहेत.
तेजस ठाकरेंना वन्यजीव संशोधनात रस आहे.
खेकडे, पाली आणि माशाच्या दुर्मिळ प्रजाती देखील त्यांनी शोधल्या आहेत.
तेजस यांनी प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आहे.