Rashmi Mane
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आज वायनाडला पोहोचले.
राहुल गांधींनी लष्कराच्या जवानांसह चुरलमाला भेट दिली.
यावेळी राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्त लोकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध मदत शिबिरांना भेटी दिल्या आहेत.
वायनाडमध्ये भूस्खलनामुळे 256 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अजून काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहुल गांधी बुधवारी (31जुलैला) वायनाडला येणार होते, मात्र खराब हवामानामुळे त्यांना कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस आणि अलप्पुझाचे खासदार के.सी. वेणुगोपालही त्यांच्यासोबत आहेत.
वायनाड येथील फोटोवरून अंदाज लावता येतो की किती मोठ्या प्रमाणात वायनाड येथील भूस्खलनामुळे चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
एनडीआरएफची टीम तसेच अनेक पथके बचाव कार्य करत आहेत.