Rahul Gandhi Wrestling: हरयाणाच्या मल्लांबरोबर राहुल गांधींनी खेळला कुस्तीचा डाव !

सरकारनामा ब्यूरो

राहुल गांधींचा हरयाणा दौरा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या हरयाणा दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

नामवंत कुस्तीपटूंची भेट

हरयाणामधील झज्जर जिल्ह्यातील ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियासह देशातील नामवंत कुस्तीपटूंची भेट घेतली.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

गांधी कुस्तीपटूंच्या आखाड्यात

त्यांनी कुस्तीपटूंच्या आखाड्यात जाऊन त्यांच्या कसरती आणि त्यांना येणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेतले.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

कुस्तीपटूंसोबत व्यायाम

साधारण सकाळी 6.15 च्या सुमारास ते तिथे पोहोचले आणि त्यांनी कुस्तीपटूंसोबत व्यायामही केला.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

बाजरीची भाकरी आणि हिरव्या भाज्यांवर ताव

पहाटेच्या व्यायामानंतर राहुल गांधींनी सगळ्यांसोबत बाजरीची भाकरी आणि हिरव्या भाज्या खाण्याचा आनंद लुटला.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

बजरंगसोबत कुस्तीचा डाव

यावेळी त्यांनी बजरंग पूनियासोबत इतर कुस्तीपटूंच्या कसरती पाहिल्या आणि काही युक्त्या जाणून घेत त्यांच्यासोबत कुस्तीचा डावही खेळला.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

पुरस्कार परत केल्यामुळे भेट

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीच्या निकालाचा निषेध करण्यासाठी अनेक कुस्तीपटूंनी त्यांचे पुरस्कार परत केल्यामुळे गांधींनी त्यांची भेट घेतली.

Rahul Gandhi Wrestling | Sarkarnama

Next : लोकसभेच्या अगोदर नितीश कुमारांचं टेन्शन वाढवणारे 'ललन सिंह' नेमके आहेत तरी कोण?