Deepak Kulkarni
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात नंदुरबार येथे दाखल झाली.
या यात्रेनिमित्त काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत.
नंदुरबार, धुळे आणि नाशिकसह ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे मोठे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्याचे ठरविले आहे.
जवळपास गेली दहा वर्षे राज्याचे आदिवासी विकासमंत्री असलेले विजयकुमार गावित यांच्या मतदारसंघात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रचंड स्वागत झाले.
काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अतिशय जल्लोषात आणि हजारो आदिवासींच्या उपस्थितीत स्वागत झाले. या वेळी काँग्रेसचे राज्यातील विविध नेते उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची आक्रमक भाषा राहुल गांधी यांनी आदिवासी भागातील या दौऱ्यात केली आहे.
उद्या ते धुळे जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. 14 मार्चला नाशिक जिल्ह्यात राहुल गांधी यांची सभा आणि रोड शो होतील.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष व त्यांचे नेतेदेखील या यात्रेत सहभागी झाले आहेत.