सरकारनामा ब्यूरो
काँग्रेसचे राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून पुन्हा सुरू झाली आहे.
रामगड येथील कोळसा कामगार दररोज सायकलने 200 किलो कोळसा घेऊन जातात.
30-40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या कष्टकरी तरुणांसोबत राहुल गांधींनी यात्रे दरम्यान संवाद साधला.
'त्यांच्यासोबत चालल्याशिवाय, त्यांचे ओझे वाटल्याशिवाय त्यांच्या समस्या समजून घेता येणार नाही' असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गोध्रा काळी वस्तीतील जनतेशीही त्यांनी संवाद साधला.
जनतेत बसून त्याचे गप्पा सत्र केले, जेणेकरुन आपुलकीच्या भावनेने त्यांच्या समस्या जाणून घेता येतील.
1857 च्या क्रांतीचे शूर शहीद आणि महान स्वातंत्र्यसेनानी शेख भिखारी आणि टिकैत उमराव सिंह यांचे रामगढच्या चुटुपालू खोऱ्यात हौतात्म्यस्थळ आहे.
शहिदांच्या प्रतिमांचे पूजन केले तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.